क्राईम डायरी
अंबाजोगाईत तरुणाची आत्महत्या

अंबाजोगाई /प्रतिनिधी
तुळजाभवानीनगरात एका तरुणाने घराच्या हॉलमधील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि.४ ) पहाटे उघडकीस आली. ऋषभ बाळासाहेब चव्हाण (२३) असे त्या मयत तरुणाचे नाव आहे. तो पुण्यात ॲनिमेशनचे शिक्षण घेत होता. गुरुवारी रात्री सर्व कुटुंबीय झोपी गेल्यानंतर मध्यरात्री त्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही.