अंबाजोगाई

अखेर भूमिहीन शेतकऱ्यांचे उपोषण सुटले !

अंबाजोगाई/प्रतिनिधी
तालुक्यातील डिघोळअंबा येथील भूमीहीन शेतकरी गेल्या चार दिवसापासून उपजिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण करत होते. पडत्या पावसामध्ये हे भूमिहीन शेतकरी आपल्याला कसण्यासाठी देवस्थानाची जमीन द्यावी व जाहीर लिलाव मध्ये ज्यांनी जाणीवपूर्वक बोली वाढवून शासनाची दिशाभूल आणि फसवणूक केली आहे त्यांच्यावर कारवाई करावी. या मागणीसाठी हे लोक उपोषण करत होते.
अंबाजोगाई येथे जावुन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा. शिवराज बांगर व अनिल डोंगरे यांनी उपजिल्हाधिकारी साहेबांची भेट घेत सर्व विषयावर चर्चा केली. जाणीवपूर्वक वाढवलेली लिलावाची रक्कम न भरणाऱ्या व्यक्तीवरती अनामत रक्कम जप्त करून कारवाई करायची मागणी करत, लिलावाची प्रक्रिया पुन्हा एकदा पार पाडण्याची मागणी केली असता, प्रशासनाने सर्व मागण्या मान्य केल्यानंतर संबंधितांचे उपोषण सोडण्यात आले. याप्रसंगी अंबाजोगाई शहराध्यक्ष अमोल हातागळे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे लक्ष

डिघोळ आंबा येथील देवस्थानच्या जमीन भूमिहीन मजुरांना शासन नियमाप्रमाणे लिलाव करून वाहिती करण्यासाठी मिळावी म्हणून गतवर्षी पासून अक्षय भूंबे यांच्या माध्यमातून लढा सुरू आहे. गतवेळेस बराच संघर्ष झाला होता. त्यावेळेस पासून वंचित आघाडी चे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे लक्ष आहे. यावेळी ही उपोषणाला मजूर बसले असताना उपोषण कर्ते आणि अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या फोनची रेकॉर्डींग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यातून प्रकाश अंबेडकर यांचे लक्ष डिघोळ अंबा येथील या प्रकरणात असल्याचे स्पष्ट होत आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!