अंबाजोगाई

आपेगाव कोविड केअर सेंटर मधील कोरोना योध्दयांचा सत्कार

अंबाजोगाई / प्रतिनिधी
सामाजिक बांधिलकीतून जि.प.सदस्य राजेसाहेब देशमुख यांनी शनिवार,दिनांक ५ जून रोजी ग्रामीण भागातील आरोग्य सेवेला बळकटी देणारे डॉक्टर्स बांधव यांचा किसान काँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष ॲड.माधव जाधव,युवक नेते राहुल सोनवणे यांच्या हस्ते सन्मान केला. तसेच गायक सुभाष शेप यांच्या गायनाने उत्साह संचारला,वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.मागील काही दिवसांपासून आपेगाव येथे डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा सेवाभाव खूपच मोलाचा ठरला आहे.त्यांच्यामुळे अनेक रूग्ण कोरोनामुक्त होऊ शकले,त्यांचे ऋण कदापि विसरता येणारे नाही अशा शब्दांत देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कोरोना रूग्णांसाठी सुरू केलेले आपेगाव येथील कोविड केअर सेंटर सर्वांच्या सहकार्यातून यशस्वी होत आहेत.डॉक्टर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सेवाभाव खूप मोलाचा होता.प्रत्येकाने एकजूटीने आणि नियोजनबद्ध रितीने काम केल्याने हे शक्य होत आहे,त्यामुळे या सर्वांचेच आभार मी व्यक्त करतो.असेच काम भविष्यातही होईल असा विश्वास व्यक्त करून पुढे बोलताना आपल्या सेवेतून आम्ही अनेक रूग्णांना ठणठणीत बरे करू शकलो याचा आनंद आहे.डॉक्टर्स,आरोग्य व स्वच्छता कर्मचारी व काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते यांनी मागील महिनाभर जे अतोनात कष्ट घेतले त्याबद्दल खरेच कौतूक वाटते असे जि.प.सदस्य राजेसाहेब देशमुख म्हणाले.अंबाजोगाई तालुक्यातील आपेगाव येथे इंटरनॅशनल डेव्हलपमेंट इंडियन असोसिएशन (इंडीया)संस्था,अंबाजोगाई यांच्या श्री जयकिसान महाविद्यालय,आपेगाव या ठिकाणी जि.प. सदस्य राजेसाहेब देशमुख यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.नानासाहेब पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त कोविड योध्दे डॉक्टर बांधवांचा सत्कार समारंभ,राडी जिल्हा परिषद सर्कल मध्ये वृक्षारोपण आणि गायक सुभाष शेप व गायिका मयुरी यांच्या गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.देशमुख यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या ५० खाटांच्या कोविड केअर सेंटर मध्ये कोरोना बाधित रूग्णांवर मोफत औषधोपचार करून रूग्णांना व्याधिमुक्त करण्यात येत आहे.कोविड योध्दे याकामी अहोरात्र परिश्रम घेत आहेत.त्याबद्दल जि.प.सदस्य राजेसाहेब देशमुख माकेगावकर यांनी शनिवार,दिनांक ५ जून रोजी आपेगाव कोविड केअर सेंटर मधील कोरोना योध्दयांचा सत्कार केला.यावेळी किसान काँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष ॲड.माधव जाधव,युवक नेते राहुल सोनवणे,पशुपतीनाथ दांगट,अंबाड,प्रतापराव मोरे,राजाभाऊ देशमुख,बळीराजे वाघमारे,आश्रुबा करडे यांचेसह डॉ.भारत नागरे,डॉ.अजय ठोंबरे,डॉ.धनेश्वर मेनकुदळे,डॉ.व्यंकट बेंबडे,डॉ.फड,डॉ.गायञी ढमाले,परीचारीका कावरे,ढाकणे,कराड,देशमुख,मुंडे,जगदाळे,शिंदे तसेच कर्मचारी अशोक राऊत,बालाजी वाघमारे,रवी सरवदे,अजित बनसोडे यांचीही उपस्थिती होती.

यांचा झाला सन्मान

कोरोना काळात स्वत:च्या जीवाची पर्वा न करता दररोज येऊन रूग्णांची तपासणी व औषधोपचार करीत त्यांची काळजी घेणारे आपेगाव कोविड केअर सेंटर मधील रूग्णसेवेतील डॉक्टर्स डॉ.भारत नागरे,डॉ.अजय ठोंबरे,डॉ.धनेश्वर मेनकुदळे,डॉ.व्यंकट बेंबडे ,डॉ.नरसिंग फड यांचा राजेसाहेब देशमुख,किसान काँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष ॲड.माधव जाधव,राहुलभैय्या सोनवणे यांच्या हस्ते शाल,पुष्पहार व पुष्प देऊन विशेष सन्मान करण्यात आला.रूग्णसेवेतून झालेली सेवा हिच खरी ईश्वर सेवा आहे.त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे आशिर्वाद राजेसाहेब देशमुख यांना मिळत आहेत असे यावेळी उपस्थित अनेकांनी सांगितले.

गायक सुभाष शेप यांच्या गायनाने उत्साह संचारला

येथील गायक सुभाष शेप व गायिका मयुरी यांनी आ.नानासाहेब पटोले यांच्या जन्मदिनानिमित्ताने आयोजित गीत गायन कार्यक्रमात देशभक्तीपर,भजन, छञपती शिवरायांवर आधारित गीत,शेतकरी गीत,गारवा आणि निसर्गराजा आदी एकापेक्षा एक सरस,सुरेल व बहारदार गीते सादर करून कोरोना बाधित रूग्णांना आपल्यासोबत ठेका धरायला लावला.उपस्थित मान्यवरांसह सर्वांनी मिळून गीत गायनात सहभागी घेतला.या अनोख्या उपक्रमाने तणावमुक्त वातावरणात दूर होऊन नवा उत्साह संचारल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

आ.नानासाहेब पटोले यांच्या जन्मदिनानिमित्ताने आरोग्य कर्मचारी कोरोना योद्धांच्या सन्मान हा उपक्रम राबविण्यात आला.याबाबत अनेकांनी दुरध्वनीच्या माध्यमातून तर काहींनी प्रत्यक्ष भेटून आनंद व्यक्त केला.

-राजेसाहेब देशमुख (जि.प.सदस्य,बी

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!