केज
आसद खतीब यांना स्वच्छता निरीक्षकपदी पदोन्नती

केज/ प्रतिनिधि:
येथील नगरपंचायतीच्या स्वच्छता निरीक्षक पदी आसद इसाकोद्दीन खतीब यांना पदेन्नती देण्यात आली आहे. त्यांनी स्थापनेपासून प्रभारी स्वच्छता निरीक्षक म्हणून पदभार सांभाळा होता.
कोरोना काळात शासनाने घालून दिलेले नियम न पाळणाऱ्या नागरीकांविरूध्द त्यांनी दंडात्मक कारवाई करीत चोख भुमीका बजावली होती. त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना स्वच्छता निरीक्षकपदी पदोन्नती देण्यात येत असल्याचे आदेश नगर परिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी यांनी ४ जून २०२१ रोजी काढले आहेत. खतीब यांना मिळालेल्या पदोन्नती बद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.