केजक्राईम डायरी
केजमध्ये तलाठ्याचे घर फोडले; ४२ हजार रुपयांचा ऐवज लंपास
केज/प्रतिनिधी
घरी कुणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी तलाठ्याच्या घराचे कुलूप तोडून घरातील ४२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. घटना केज शहरात कळंब रस्त्यावर घडली.
तलाठी फजल फरिद शेख यांचे शहरातील कळंब रस्त्यावर संतोष हॉटेलसमोर घर आहे. शेख हे एका कार्यक्रमासाठी बाहेर गेले होते. २ जून रोजी मध्यरात्री चोरट्यांनी त्यांच्या घराच्या गेटचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील लॅपटॉप, सोन्याची रिंग, एलईडी, पितळी भांडे असा ४२ हजारांचा ऐवज घेऊन पोबारा केला. शेख यांच्या फिर्यादीवरून चोरट्यांविरुद्ध केज पोलिसांत गुन्हा दाखल केला.