अंबाजोगाईक्राईम डायरी

घाटनांदुर येथून वीजतार चोरी

घाटनांदुर/ प्रतिनिधी
येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील वीज वितरण कंपनीची वीज खांबावरील तार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी ( दि. ४) घडली. याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला
घाटनांदूर येथील शेतकरी संजय बाबुराव रानभरे यांच्या शेतातील 4 वीज खांबावर अलेली वीजतार अंदाजे 900 फूट व 8 हजार रुपये किमतीची अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी एमएसइबी पथक कार्यालय घाटनांदुर ते वरिष्ठ तंत्रज्ञ जयंत लक्ष्मण बागवाले यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात पूर्ण गुरनं 170/ 2021 कलम 379 भादवी नुसार गुन्हा दाखल झाला आहे अधिक तपास पोहेकॉ सावंत करीत आहेत

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!