शिरूर

चिमुकल्यांना आमरसाची मेजवानी

शिरूर/प्रतिनिधी 

शिरूर तालुका शिवसेनेच्या वतीने येथील सेवाश्रम प्रकल्पात संगोपनासाठी असणाऱ्या गोरगरीब तमाशा कलावंतांच्या मुलांना आमरसाची मेजवानी दिली. शिरूर तालुका शिवसेनेच्या वतीने कोरोना काळात रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, रुग्णांना फळे वाटप असे सामाजिक कामे करून शिवसेनेचा वारसा जपला असून शनिवारी (ता.५ जून) शिरूर कासार येथील शिवसैनिक अजिनाथ खेडकर व त्यांच्या पत्नी शिक्षिका रंजना खेडकर यांनी ब्रम्हनाथ येळंब येथील तमाशा कलावंतांच्या मुलांसाठी असणाऱ्या सेवाश्रम या संस्थेतील मुलांना आम्ररसाची मेजवानी दिली. यावेळी मुलांना आंब्याचा देखील आस्वाद घेता आला. यावेळी संस्थेचे संचालक सुरेश राजहंस व मयूरी राजहंस यांनी आभार मानले.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!