क्राईम डायरीधारुर

जहागीर मोहा येथे एकाचे डोके फोडले

धारूर /प्रतिनिधी
किरकोळ कारणावरून शिवीगाळ करीत एकाचे डोके फोडल्याची घटना तालुक्यातील जहागीर मोहा येथे शुक्रवारी ( दि. ४) घडली. याप्रकरणी दोघांवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शेतातील बांधावर ठेवलेले लाकडाचे कारण काढून शिवीगाळ करीत दगडाने डोके फोडले. पत्नी व भावास लाथाबुक्क्यांनी मारहाण व शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी धनराज नामदेव शिंदे (रा. जहागीरमोहा) यांच्या फिर्यादीवरुन बालासाहेब सुखदेव शिंदे, सुखदेव गणपती शिंदे ( दोघेही रा. जहागीरमोहा) यांच्यावर धारूर पोलीस ठाण्यात गुरनं 112/ 2021 कलम 324, 323, 504, 506, 34 भादवी नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!