
बीड/प्रतिनिधी
पर्यावरण नैसर्गिक ऑक्सीजन वृध्दी होण्यासाठी १ व्यक्ती ३ झाडे या प्रमाणात वृक्ष लागवड करून वृक्ष लागवड-२०२१ कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यात गाव तिथे देवराई निर्माण करण्यात येणार आहे. जागतिक पर्यावरण दिनी जिल्ह्यात १ लाख १० हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.
वृक्ष लागवड-२०२१ या कार्यक्रमाचा शुभारंभ दि.५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये होणार आहे. या शुभारंभासाठी प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये किमान १०० झाडांची वृक्ष लागवड केली आहे. तसेच गतवर्षी लावलेल्या झाडांचे व घनवृक्ष लागवडीचे वाढदिवस साजरे केले जाणार आहेत. एकूणन १०३१ ग्रामपंचायत अंतर्गत प्रत्येकी १०० झाडे लावण्यात येणार आहेत. यासाठी लागणारी रोपे सामाजिक वनीकरण विभाग, वन विभाग व कृषी विभागातील रोपवाटिकेतून ग्रामपंचायत त्यांचे निधीतून प्राप्त करून घेणार आहेत. वृक्ष लागवड-२०२१ शुभारंभ करण्यासाठी लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद अध्यक्ष, सर्व सभापती व पंचायत समिती सदस्य यांनी कार्यक्रमात सहभाग घेण्याबाबत सर्व गटविकास अधिकारी यांना कळविण्यात आलेले आहे.तसेच कोरोना विषयक नियमांचे पालन करून कार्यक्रम घेण्याबाबत आदेशीत केले आहे. जिल्हास्तरावरून मुख्यकार्यकारी अधिकारी अजित कुंभार हे शुभारंभ करणार आहे