परळी

डाॅक्टर्स अन् आरोग्य कर्मचाऱ्यांचा सेवाभाव  मोलाचा. – पंकजा मुंडे यांचे प्रतिपादन

परळी/प्रतिनिधी  

गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या सेवा यज्ञात शहरातील डाॅक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा सेवाभाव खूपच मोलाचा ठरला. त्यांच्यामुळेच अनेक रुग्ण कोरोनामुक्त होऊ शकले. त्यांचे ऋण कदापि विसरू शकणार नाही, अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने सूक्ष्म लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांसाठी अक्षता मंगल कार्यालयात सुरू केलेल्या सेवा यज्ञाच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या. खासदार डाॅ. प्रीतम मुंडे, भाजपचे ज्येष्ठ नेते दत्ताप्पा इटके, विकासराव डुबे, राजेश देशमुख, तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, वैद्यनाथ बँकेचे अध्यक्ष अशोक जैन, विनोद सामत, शिवाजीराव गुट्टे, श्रीहरी मुंडे, नीळकंठ चाटे, जयश्री मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.कोरोना रुग्णांसाठी सुरू केलेला सेवा यज्ञ सर्वाच्या सहकार्यातून यशस्वी झाला. डाॅक्टर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांचे योगदान मोलाचे होते. प्रत्येक कार्यकर्त्यांनी एकजुटीने आणि नियोजनबद्ध रितीने काम केल्याने हे शक्य झाले, या सर्वांचेच ऋण मी व्यक्त करते. असेच काम भविष्यातही होईल असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला. खासदार डॉ.प्रीतम मुंडे यांनी डाॅक्टर्स, आरोग्य व स्वच्छता कर्मचारी व भाजपचे सर्व कार्यकर्ते यांनी गेले महिनाभर जे अतोनात कष्ट घेतले त्याबद्दल खरच कौतूक वाटते असे सांगितले.

डाॅक्टरांचा केला विशेष सन्मान

डाॅ. हरिश्चंद्र वंगे, डाॅ. एल. डी. लोहिया, डाॅ. शालिनी कराड, डाॅ. दीपक पाठक, डाॅ. विवेक दंडे, डाॅ. संदीप घुगे, डाॅ. दुष्यंत देशमुख, डाॅ. वाल्मीक मुंडे, डाॅ. आनंद मुंडे, डाॅ. विनोद कांगणे, डाॅ. विशाखा देशमुख, डाॅ. प्रीतम धुमाळ यांच्यासह स्वच्छता कर्मचारी सविता जगतकर, मनीषा राऊत, संगीता गायकवाड, राजश्री धोकटे, परिचारिका सुवर्णा कोंडेकर, अर्चना जगतकर, राजेश्वरी गोस्वामी, अर्चना ढाकणे, सारिका मुंडे, प्रतिभा हनवटे यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.आरोग्य कर्मचाऱ्यांचा परळी येथे सत्कार करण्यात आला. 

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!