अंबाजोगाईक्राईम डायरी

डीन कार्यालयासमोरून मोटरसायकल चोरी

अंबाजोगाई /प्रतिनिधी 

येथील स्वाराती शासकीय रुग्णालयाच्या कार्यालयासमोर मोटरसायकल चोरी झाल्याची घटना गुरुवारी( दि. ४) घडली. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.  मेडिकल परिसरात राहणारे गंगाधर कानोबा शिंदे यांनी आपली हिरो होंडा पॅशन प्रो मोटरसायकल ( एम. एच 22 डब्ल्यू 7938) डीन कार्यालयासमोर लावली होती. कार्यालयातून बाहेर आल्यानंतर त्यांची मोटरसायकल चोरी गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी गंगाधर शिंदे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!