क्राईम डायरीधारुर
धारूर येथे मेडिकल स्टोअर्स चालकाची गळफास लाऊन आत्महत्या

किल्ले धारूर: शहरातील मेडिकल स्टोअर्स चालकाने राहत्या घरी गळफास लाऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी ( दि. १४) दुपारी उघडकीस आली. श्याम आप्पाराव तिडके ( वय: ४८) असे आत्महत्या केलेल्या मेडिकल स्टोअर्स चालकाचे नाव आहे.
कोणत्या कारणामुळे मेडिकल स्टोअर्स चालक श्याम तिडके यांनी आत्महत्या केली हे कळू शकले नाही. त्यांची पत्नी खाजगी शाळेत शिक्षीका असून त्या शाळा सुटल्यानंतर घरी आल्यानंतर श्याम तिडके यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. तिडके यांच्या आत्महत्येमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तिडके यांची पत्नी शिक्षीका असून दोन मुले वैद्यकीय शिक्षण घेत आहेत.