माजलगाव

पटेल कोविड सेंटरचा रीकवरी रेट ९९ टक्के

माजलगाव/ प्रतिनिधी
एप्रिल महिन्यामधे तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या व कोवीड सेंटरचा कमतरता ही अडचण लक्षात घेऊन जमात उलमा हींद चे तालुकाध्यक्ष तथा समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मुज्जमिल पटेल यांनी सेवाभावीवृत्तीतुन केशवराज मंगलकार्यालय, केसापुरी कँम्प येथे आयसीयुबेडसह सुसज्ज कोवीड सेंटरची उभारणी केली. मागील पंचेचाळीस दीवसांमधे येथिल ऑक्सीजन सुविधेमुळे कित्येकांचे जीव वाचले.निष्णांत डॉक्टरांचे प्रयत्न व उत्कृष्ट नियोजनामुळे येथिल रीकव्हरी रेट ९९ टक्के आहे.
या कोवीड सेंटरमधे आयसीयु बेड २० व जनरल बेड ३० असे एकुण पन्नास बेडची व्यवस्था आहे. नामदार पालकमंञी धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत पटेल कोवीड सेंटरचा शुभारंभ झाला होता. आज घडीला शेकडो पेशंट येथे उपचार घेऊन ठणठणीत बरे झाले आहेत. याठीकाणी डॉ. डी. व्ही गिलबिले, डॉ. विनायक चव्हाण, डॉ. मौह तौसिफ, डॉ. अरबाजोद्दीन काझी, डॉ. शहानवाझ आत्तार, डॉ. शेख विखार, डॉ. अफरोज शेख, डॉ. नेहाश्री जाधव, डॉ. रीहान शेख , डॉ. अमरीन काझी, परिचारीका शेख जोया हबिब, पार्वती निसर्गंध, कमळे सोनाली सह, व्यवस्थापक मुशर्रफ शेख हे अहोराञ परीश्रम घेत आहेत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!