माजलगाव

पहील्याच पावसात माजलगाव- मोगरा -कोथाळा रस्त्याची दुरावस्था

माजलगाव: मान्सुनपुर्व पहील्याच अवकाळी पावसाने माजलगावतालुक्याला जोडणा-या मोगरा-कोथाळा-सिरसाळ्यासह वीस गावांचा जोडणा-या रस्त्यांची प्रचंड वाताहत झाली आहे. पुर्वी उसवाहतुक करणा-या अवजड वाहनांच्या रहदारी मुळे अगोदरच रर्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले होते त्यात भरीस भर पडलेल्या अवकाळी पावसाने रस्ता पुनत: खचला आहे. या रस्त्यावरुन दुचाकी व चारचाकी चालकांना जीव मुठीत घेऊनच वाहन चालवावे लागते. वीस कि. मी.चे अंतर कापायला वाहनाला तासभर वेळ लागतो. लोक्रतीनिधींनीनी व प्रशासनाने याकडे नेहमीच दुर्लक्ष केले आहे.
आता पावसाळ्याच्या तोंडावर तरी याकडे लक्ष देऊन रस्त्याचे काम दर्जेदार करावे अशी मागणी वाहनचालक व ग्रामस्थांच्या करण्यात येत आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!