क्राईम डायरीबीड

भरधाव जीप उलटून एक ठार

बीड /प्रतिनिधी

भरधाव जीप उलटून एक जागीच ठार झाला तर सहा जण जखमी झाले. ही घटना शुक्रवारी (दि.४) पहाटे तीन वाजता धुळे-सोलापूर महामार्गावरील उदंड वडगावजवळ घडली.
संदीप महादेव माने (२६, रा.पाली, ता.बीड) असे मृताचे नाव आहे. ते जीपमधून (एमएच २३ एडी ५५९५) बीडकडे येत होते. उदंड वडगावजवळ चालकाचा ताबा सुटल्याने जीप रस्त्याखाली जाऊन उलटली. यात गंभीर जखमी होऊन संदीप माने याचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच नेकनूर ठाण्याच्या पोलिसांनी धाव घेतली. दरम्यान, जखमींपैकी काही जणांना खासगी दवाखान्यात हलवण्यात आले. जखमींचा जवाब अद्याप बाकी असून त्यानंतरच अपघात नेमका कसा झाला हे समजू शकेल, असे सहायक निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी सांगितले.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!