अर्थविश्वदेश-विदेश

भारतालाही मागे टाकत ‘ह्या’ देशाने साधली प्रगती; दरडोई उत्पन्नाबाबत भारताच्याही पुढे

महासंदेश, (दि. २२)- एकेकाळी गरीब असणारा बांगलादेश आता प्रगती पथावर आहे. भारतापेक्षाही जास्त प्रगती बांगलादेशने केली आहे. 2020-21 आर्थिक वर्षात बांगलादेशने दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत बरीच प्रगती केली आहे. याच जोरावर दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत भारत बांगलादेशपेक्षा मागे पडला आहे आणि आता बांगलादेशी नागरिक भारतीय नागरिकांपेक्षा श्रीमंत झाले आहेत. 1971 मध्ये बांगलादेश स्वतंत्र झाला तेव्हा हा सर्वात गरीब देशांपैकी एक होता.
 2020-21 आर्थिक वर्षात बांगलादेशाचे दरडोई उत्पन्न 2227 डॉलर म्हणजेच 1.62 लाख होते जे मागील आर्थिक वर्षात  2064 डॉलर म्हणजेच 1.46  लाख रुपये होते. दरडोई उत्पन्नातील ही वाढ भारताला मागे ठेवून गेली आहे. भारताचे दरडोई उत्पन्न 1947 डॉलर म्हणजेच 1.41 लाख रुपयांपेक्षा थोडे जास्त आहे.  

भारत सरकारच्या ताज्या आकडेवारीनुसार कोरोना विषाणूच्या साथीमुळे लावलेल्या लॉकडाऊनमुळे आर्थिक क्रियाकलाप कमी झाल्याने देशात दरडोई उत्पन्नात घट झाली आहे. बांगलादेशचे कॅबिनेट सचिव अन्वरुल इस्लाम म्हणाले की, देशाचे दरडोई उत्पन्न आता 2227 डॉलर्सवर पोहोचले आहे आणि देशाच्या ग्रोथ रेट 9 टक्क्यांनी वाढला आहे.
  गेल्या वर्षी  इंटरनेशनल मोनेटरी फंड (IMF)ने  म्हटले होते की 2020 मध्ये दरडोई जीडीपीच्या बाबतीत बांग्लादेश भारताला मागे टाकेल. आयएमएफचा हा अंदाज योग्य सिद्ध झाला आहे. स्वातंत्र्यापासून बरीच लोकसंख्या असलेला  बांगलादेश गरीबीशी झगडत आहे. 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!