महाराष्ट्र

मराठा आरक्षण मोदींचा मुद्दा नाही , शरद पवारांनी लक्ष घालावे : खा. उदयनराजे

मराठा आरक्षणबाबत खा. उदयनराजे यांनी आज मोठे वक्तव्य केले. वडीलकीच्या नात्याने शरद पवारांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यात लक्ष घालावे, अशी मागणी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
‘मराठा आरक्षण’ हा मोदींचा राजकीय मुद्दा असूच शकत नाही. यामध्ये कोणीही राजकारण आणू नये. हा विशिष्ट समाजाचा प्रश्न आहे. मराठा समाजातील लोकप्रतिनिधी या नात्याने व राज्य शासनाने बाजू मांडण्याचे काम कले पाहिजे. मात्र, तसे होताना दिसत नाही. त्यामुळे मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते म्हणून, तसेच महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा म्हणून शरद पवारांनी वडिलकीच्या नात्याने मराठा आरक्षण प्रश्नात लक्ष घालावे. अन्यथा उद्रेक होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
खा. उदयनराजे भोसले पुढे म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांची भेट घेतली असून आरक्षणाबाबत लक्ष घाला, अन्यथा उद्रेक होईल असं त्यांना सांगितले. आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात वकिलांकडून योग्य मांडणी झाली नाही, असंही निरीक्षण त्यांनी भेटीदरम्यान नोंदवलं. राज्य सरकारनं लवकरात लवकर योग्य तोडगा काढणं गरजेचं आहे. राज्य सरकारनं आरक्षणाबाबत श्वेतपत्रिका काढावी, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!