लॉकडाउनमध्ये बालविवाहांचा सपाटा!

‘या’ ठिकाणी अवघ्या चार दिवसात पोलिसांनी रोखले ‘दोन’ बालविवाह
महासंदेश : कोरोनाने अवघ्या जगाला वेठीस धरले असून आज देशासह अनेक राज्यात लॉकडाउन लागू आहे . यात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक निर्बंध लादले आहेत . परंतु या कठीण काळात देखील अनेकजण विवाहासह इतर धार्मिक विधी उरकत आहेत. परंतु यात गंभीर बाब म्हणजे यातील अनेक विवाह हे बालविवाह असल्याचे समोर आले आहे. हा प्रकार नागपूरमध्ये सर्वात पाहायला मिळत आहेत. मागील चार दिवसात पोलिसांनी दोन बालविवाह रोखण्यात यश आलं आहे .नुकताच आणखी एक बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश आलं आहे. नागपूरजवळील नवी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत हा बालविवाह पार पडणार होता. परंतु याबाबत पोलिसाना माहिती मिळताच लग्न लागण्याच्या आधीच हा विवाह थांबविला.
यामध्ये वधू अवघी १७ वर्षाची तर वर १८ वर्षांचा होता. त्यांचा विवाह होणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. दोन्हीकडील मंडळींनी
लग्नाची सगळी तयारी करुन मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पाडण्याची योजना आखण्यात आली हाती. मात्र त्यांचा हा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला .
पोलिसांनी जिथे हा विवाह पार पडणार होता तिथे छापा टाकला आणि हा बालविवाह रोखला. नागपुरात बालविवाह होण्याचे हे काही पहिले प्रकरण नाही.