क्राईम डायरीगेवराई
शेततळ्यात बुडून बापलेकासह भाच्याचा मृत्यू

गेवराई /प्रतिनिधी
तालुक्यातील दैठण येथील एका शेततळ्यात बुडून बाप-लेकासह भाच्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे..
सुनील जगन्नाथ पंडित (वय ४०) त्यांचा मुलगा राज पंडित ( वय १२) आणि सुनील पंडित यांचा भाचा आदीत्य पाटील ( वय १०) शेत तळ्यावर पोहण्यासाठी गेले होते. यावेळी राज आणि सुनील यांचा भाचा हे दोघेजण पोहण्यासाठी शेततळ्यात उतरले असता ते दोघे पाण्यात बुडू लागले. हे पाहून सुनील पंडित यांनी शेततळ्यात उडी मारून या दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना ही पोहता येत नसल्याने या तिघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.