सनी लिओनीने 29 लाख घेतले अन केले ‘असे’ काही ; तरुणाने दिली कम्प्लेंट

सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी केरळमध्ये गेलेल्या अभिनेत्री सनी लिओनीची केरळ क्राइम ब्रांचकडून चौकशी करण्यात आली. सनीविरोधात २९ लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार एका व्यक्तीने दाखल केली होती. त्या व्यक्तीचे नाव आर. श्रेयस आहे त्यानेच सनी लिओनीवर 29 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला होता. यसचा आरोप आहे की, सनीने दोन इवेंटमध्ये येण्यासाठी ही रक्कम घेतली होती पण नंतर त्या इवेंटला येण्यास नकार दिला. या प्रकरणात शुक्रवारी रात्री केरळ गुन्हे शाखेने सनी लिओनीला चौकशीसाठी बोलावले होते. रिपोर्ट्सनुसार, सनीने या चौकशीत गुन्हे शाखेच्या आधिकाऱ्यांना सांगितले की, देशात कोरोनाव्हायरस साथीचा रोग असल्याने ती या दोन्ही इवेंटमध्ये येऊ शकली नाही.
“नियोजित कार्यक्रमाची तारीख बऱ्याच वेळा पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे इतर कार्यक्रमांच्या तारखांमध्ये अडचण झाली होती. करारानुसार मला माझी पूर्ण रक्कम देण्यात आली नव्हती. साडेबारा लाख रुपये त्यांनी थकवले आहेत”, अशी माहिती सनीने क्राइम ब्रांचला दिली. क्राइम ब्रांचने दोन पक्षांचे व्हॉट्स अॅप चॅट्ससुद्धा तपासून पाहिले. याप्रकरणी क्राइम ब्रांच सध्या कार्यक्रमाला हजर लावणाऱ्या इतर सेलिब्रिटींचा शोध घेत आहे.