अंबाजोगाईकृषी

हिवरा येथे पशूंचे लसीकरण

आपेगाव / प्रतिनिधी
अंबाजोगाई तालुक्यातील आपेगाव येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-2 या कार्यक्षेत्रात अंतर्गत हिवरा खुर्द या गावातील सर्व पशूंना मान्सून पूर्व लस देण्यात आली.
मान्सून पूर्व पशूंना रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पशुवैद्यकीय रुग्णालया मार्फत पशूंचे लसीकरण केले जाते. या मोहिमेअंतर्गत आपेगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात श्रेणी- 2 अंतर्गत येणारा हिवरा खुर्द या गावात पशूंचे लसीकरण करण्यात आले. यावेळी गाय व म्हैस या वर्गातील 319 तर शेळी गटातील 53 असे 372 पशूंचे लसीकरण करण्यात आले. लस देताना कोरोणा पादुर्भाव होऊ नये म्हणून सर्व जबाबदारी पाळण्यात आली. यावेळी घटसर्प ,फऱ्या ,आंत्रविषार या लसी टोचण्यातआत आल्या. याप्रसंगी तालुका पशुधन अधिकारी डॉ. सुदर्शन मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बी. एस. कोकाणे, परीचर व्ही. बी. गायकवाड यांनी या सर्व पशुंचे लसीकरण करण्यात आले हे लसीकरण करण्यासाठी गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनी सहकार्य केले.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!