क्राईम डायरीमाजलगाव

मंजरथमध्ये दोन गटांत हाणामारी; गुन्हा नोंद

माजलगाव /प्रतिनिधी
तालुक्यातील मंजरथ येथे शिवीगाळ केल्याच्या कारणावरून व भांडण करू नका असे सांगण्याच्या कारणावरून दोन गटांत हाणामारी झाली. शनिवारी रात्री ही घटना घडली. परस्परविरोधी फिर्यादीवरून आठ जणांवर ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

याबाबत शेख सरताज शेख बशीर (रा.मंजरथ) यांच्या तक्रारीनुसार, आरोपी आपसात भांडण करत होते, त्यावेळी त्यांना ‘तुम्ही येथे भांडण करू नका असे शेख सरताज यांनी सांगितले, त्यावरून संतापलेल्या चौघांनी संगनमत करत कुऱ्हाडीच्या दांड्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत धमकावले. या प्रकरणी शेख पाशा, शेख शकील, शेख अखिल व शेख सलीम (सर्व रा.मंजरथ) यांच्यावर ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
दरम्यान शेख अखिल यांनीही तक्रार दिली. वडिलांच्या शिवी देण्याच्या कारणावरून आरोपींनी डोक्यात काठी मारुन त्यांच्या भावांनाही काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!