जवाहर विद्यालयाची अभिप्रिया इबिते राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत उत्तीर्ण

माजलगाव/ प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत केसापुरी वसाहत येथील जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थीनी अभिप्रिया इबिते उत्तीर्ण झाली.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने डिसेंबर २०२० मध्ये इयत्ता दहावीसाठी आयोजित या राज्यस्तरीय परीक्षेसाठी मुख्याध्यापक अभिमन्यु इबिते, मोरेश्वर मसलेकर, बजरंग बनसोडे, उत्तम वाले आणि लक्ष्मीकांत भोले यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल नवविकास मंडळाचे अध्यक्ष ॲड.एस.आर.शर्मा, कार्यवाह माजी शिक्षक आमदार डी.के.देशमुख, उपाध्यक्ष ॲड.एस.बी.मुळी, शालेय समितीचे अध्यक्ष ॲड.आर.डी.भिलेगावकर, संचालक ॲड.ए.एम.मोगरेकर, आर.बी.देशमुख, जी.एल.जोशी सदस्य ॲड.सुलभाताई देशमुख, शिरीष देशमुख, डॉ.सचिन देशमुख, पर्यवेक्षक के.एल.मोताळे यांच्यासह सर्व शिक्षक आणि कर्मचारी यांनी अभिप्रियाचे अभिनंदन करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.