केज

माळेगाव येथे पादचाऱ्यास मोटार सायकलची धडक

गौतम बचुटे/केज: केज-कळंब रोडवर माळेगाव येथे एका शेतातून घराकडे येणाऱ्या पादचाऱ्यास मोटार सायकलने धडक दिली असून पादचारी गंभीर जखमी झाला असून मोटार सायकलस्वार किरकोळ जखमी झाला आहे.

या बाबतची माहिती अशी की, दि. ९ फेब्रुवारी बुधवार रोजी सायंकाळी ७:०० वा. च्या दरम्यान केज कळंब महामार्गावर माळेगाव येथे मोटार सायकलने शेतातून घराकडे येत असलेले अरुण ज्ञानोबा बरकसे रा. माळेगाव याला मोटार सायकलस्वार अझरोद्दीन शेख, मोहा ता. कळंब जि. उस्मानाबाद याने निष्काळजीपणे त्याच्या ताब्यातील मोटार सायकल क्र. (एमएच-१४/एपी-०२६५) चालवून जोराची धडक दिली. या अपघातात अरुण बरकसे यांच्या डोक्याला, पायाला व हाताला गंभीर मार लागला असून रक्तस्राव झाला आहे. तसेच मोटार सायकलस्वार अझरोद्दीन शेख यालाही किरकोळ स्वरूपाचा मार लागून जखमी झाला. अपघातातील जखमी दोघांनाही केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!