गेवराई
ट्रॅक्टर-पिकअपच्या धडकेत बाप-लेकाचा मृत्यू; मुलगी गंभीर

गेवराई: पिकअप आणि ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेत बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाला असून मुलीसह तिघे गंभीर जखमी झाले. हा भीषण अपघात गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन शनीचे रोडवर बुधवारी (दि.१६) रात्री ११ वाजताच्या सुमारास झाला.
चंद्रशेखर शामराज पाठक (वय ३९) व त्यांचा मुलगा आर्यन (वय १२) अशी अपघातात मृत झालेल्या बाप-लेकाची नावे आहेत. तर, चंद्रशेखर पाठक यांनी मुलगी मंजरी (वय ११) हिच्यासह अन्य दोघे गंभीर जखमी आहेत. जखमींना बीड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात केले आहे.