केज कळंब रोडवर बुद्धसृष्टी जवळील पुलावर मोटार सायकलचा अपघात : अपघातात पती-पत्नी जखमी

गौतम बचुटे/केज :- केज कळंब रोडवर बुध्दसृष्टी जवळ असलेल्या पुलावर मोटार सायकलीच्या झालेल्या अपघातात मोटार सायकल वरील पती-पत्नी जखमी झाले आहेत.
या बाबतची माहिती अशी की, दि. १८ एप्रिल सोमवार रोजी केज-कळंब महामार्गावर बुध्दसृष्टी जवळच्या पुलावर काशिनाथ महादेव राऊत वय (४८ वर्ष) आणि यांची पत्नी सौ राऊत वय (४० वर्ष) हे मोटार सायकल क्र (एम एच ४४/डब्ल्यू- ०१७१) साळेगावकडे येत असताना रात्री ९:०० वा. दरम्यान त्यांचा अपघात झाला. अपघातात काशिनाथ राऊत यांच्या डोक्याला गंभीर स्वरूपाचा मार लागला आहे. काशिनाथ राऊत आणि त्यांची पत्नी सौ. राऊत यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय कळंब येथे प्रथमोपचार करण्यात आले. काशिनाथ राऊत यांच्या डोक्याला गंभीर स्वरूपाचा मार असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी लातूर येथे हलविले आहे. दरम्यान अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या पुलावर रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असून वाहतूक सुरळीत होण्यासाठी कोणतीही रस्ता सुरक्षेची काळजी घेतली नसल्यामुळे अपघात घडले यायची शक्यता नाकारता येत नाही. अपघाताची माहिती मिळताच युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. संदीप दहीफळे यांच्या आदेशावरून पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले.