अंबाजोगाई

दुचाकीच्या अपघातात शिक्षक सुरेश धिमधिमे जखमी

अंबाजोगाई: दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने शिक्षक सुरेश धिमधिमे व त्यांच्यासोबत असलेल्या एक जण जखमी झाल्याची घटना आडस रोडवर दि. २० रोजी घडली. या प्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा दाखल झाला आहे.
शिक्षक सुरेश भानुदास धिमधिमे (रा. फुलेनगर)  व लक्ष्मण भगवान इंगोले हे शाळेला जाण्यासाठी आपल्या दुचाकीवरून दि. २० रोजी सकाळी ८ वाजता जात होते.   यावेळी आडस रोडवर असलेल्या चव्हाण  वेअर हाऊस समोर विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराने आपले वाहन हयगईने व  निष्काळजीपणे चालवून सुरेश धिमधिमे यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली यात सुरेश व पाठीमागे बसलेले लक्ष्मण इंगोले हे जखमी झाले. या प्रकरणी सुरेश धिमधिमे यांच्या फिर्यादीवरून दुचाकी चालक एम एच २४ एफ६३७६ याच्याविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!