अंबाजोगाई
सायली लॉन्स समोर ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; एक ठार

अंबाजोगाई: अंबाजोगाई ते लोखंडी सावरगाव रस्त्यावरील सायली लॉन्स समोर ट्रॅव्हल्सने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याची घटना रविवारी दि 24 एप्रिल रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास घडली असून दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू झाला आहे.
अपघातातील मृत्यू झालेल्या तरुणाचे तुषार कोपले असं नाव आहे तुषार चे लोखंडी सावरगाव जवळ हॉटेल आहे. रात्री हॉटेल बंद करून घराकडे येत असताना सायली लॉन्स समोर पाठीमागून येणाऱ्या ट्रॅव्हलने जोराची धडक दिली या अपघातात तुषारचा मृत्यू झाला आहे.दरम्यान दोन दिवसापासून अपघाताची मालिका सुरूच आहे दोन दिवसात नऊ जणांचा अपघातात मृत्यू झाला असून रस्त्यावर दुभाजक लावण्याची मागणी नागरिक करत आहेत.