अंबाजोगाई

अपघाताची मालिका सुरूच; सेलूअंबा टोल नजीक पेट्रोल पंपासमोर दुचाकीस्वराला टँकरची पाठीमागून धडक; महिलेचा मृत्यू

अंबाजोगाई: अंबाजोगाई- लातूर महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून मंगळवारी दि. 3 रोजी पुन्हा सेलूअंबा टोल नजीक पेट्रोल पंपासमोर दुचाकीस्वराला टँकरने पाठीमागून धडक दिल्याची घडली असून यात महिलेचा मृत्यू झाला आहे.

अंबाजोगाई लातूर महामार्गावरील टोलनाक्याजवळ असलेल्या पेट्रोल पंपासमोर अंबाजोगाईकडून लातूरला जाणाऱ्या मोटरसायकल क्रमांक MH14 DQ 8302 ला टँकर क्रमांक MH 43 Y7555 च्या चालकाने पाठीमागून धडक दिली यात मोटारसायकल वरील महिलेचा जागेवरच मृत्यू झाला असून, कोमल ढगे वय 40 वर्षे असं मयत झालेल्या महिलेचं नाव आहे.

पती विशाल ढगे वय 48 वर्षे गंभीर जखमी असून पुढील उपचारासाठी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. मोटारसायकल वरील दोघे पती पत्नी हे लातूर जिल्ह्यातील मांजरी गावचे असल्याची प्राथमिक माहिती सायगाव येथील सामाजिक कार्यकर्ते असेफ सय्यद यांनी दिली आहे. दरम्यान मंगळवारी दुपारी जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी अपघात होत असलेल्या रोडची पाहणी केली असून अधिकाऱ्यांना उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!