केज

केज-अंबाजोगाई रोडवर भीषण अपघातात चार ठार तर पाच पेक्षा जास्त जखमी

वडिलांचे क्रियाकर्म आटोपून जात असताना काळाचा घाला !

गौतम बचुटे/केज :- वडीलांच्या मृत्यू नंतर सावडण्याच्या कार्यक्रम आटोपून आंबेजोगाईकडे जात असलेल्या रिक्षाला एका भरधाव वेगात येणाऱ्या इनोव्हा कारने जोरदार धडक दिल्याने रिक्षातील तीन प्रवासी व रिक्षा चालकासह चौघांचा मृत्यू झाला आहे. तर पाच प्रवासी जखमी झाले आहेत.

या बाबतची माहिती अशी की, दि. २ जून गुरुवार रोजी केज येथील धारूर रोड जवळील भवानी माळ वस्तीवर राहत असलेले शिकलकरी समाजातील नागरिक हे त्यांच्या समाजातील चरणसिंग गोके यांच्या अंत्यविधी नंतरचे क्रियाकर्मचा कार्यक्रम आटोपून सायंकाळी ५:०० वा च्या दरम्यान अंबाजोगाईकडे रिक्षा क्र. (एम एच-२३/एक्स-५२२९) जात असताना चंदनसावरगाव ते होळच्या दरम्यान होळ शिवारातील गोसाव्याचे शेत नावाने ओळखल्या जात असलेल्या शेता जवळ अंबाजोगाई कडून येणाऱ्या एका भरधाव वेगतील इनोव्हा गाडीने क्र. (एम एच १६/सी एन-७००) या गाडीने जोराची धडक दिली. हा अपघात एवढा भयानक होता की, रिक्षाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडाल्या आणि रिक्षातील मच्छिंद्रसिंग ग्यानसिंग गोके, प्रिया दीपकसिंग गोके, वीरसिंग दीपकसिंग गोके रा. केज आणि रिक्षा चालक बालाजी मुंडे रा. पिसेगाव हे चारजण जागीच ठार झाले तर हरजितसिंग बादलसिंग टाक, चंदाबाई बादलसिंग टाक, मालासिंग दुर्गासिंग रा. जालना आणि दीपकसिंग मच्छिंद्रसिंग गोके, गोविंदसिंग मच्छिंद्रसिंग गोके रा. भवानी नगर केज हे पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर अंबाजोगाई} येथील स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार सुरू आहेत.

अपघातस्थळी अधिकाऱ्यांनी दिली भेट

अपघाताची माहिती मिळताच युसूफवडगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. संदीप दहीफळे आणि त्यांच्या टीमने भेट देऊन अपघातातील जखमी व मयत यांना दवाखान्यात पाठविले आणि अपघातातील वाहने बाजूला सारून वाहतूक सुरळीत केली.तसेच उपविभागीय कार्यकारी दंडाधिकारी तथा उपजिल्हाधिकारी शरद झाडके, सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि तहसीलदार दुलाजी मेंडके यांनी घटनास्थळी भेट दिली.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!