केज
केज-कळंब रोडवर विठाई पुरम जवळ पादचाऱ्या कारने उडविले

गौतम बचुटे /केज :- केज येथे सायंकाळी ७:३० वा च्या दरम्यान केज-कळंब रोडवर विठाई पुरम जवळ रस्ता ओलांडीत असताना एका पादचाऱ्यास भरधाव कारने उडविले.
दि.४ मे शनिवार रोजी सायंकाळी ७:३० च्या दरम्यान केज-कळंब रोडवर विठाई पुरम जवळ भगवानदास पापलाल लोहिया यांचे मेव्हणे विजयप्रकाश मालपाणी, वय (५५ वर्ष) रा. कळंब व त्यांची पत्नी हे दोघे रस्ता ओलांडित असताना कळंब कडून येणाऱ्या भरधाव कारने धडक दिली. यात विजयप्रकाश मालपाणी यांच्या डोक्याला मार लागला असून त्यांच्यावर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सूरु आहेत. अपघातातील जखमींची तब्बेत चांगली सल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे.दरम्यान अपघात घडताच चालकाने त्याच वाहनातून जखमीस दवाखान्यात दाखल केले.