केजक्राईम डायरी

मोबाइल चोरीचा आळ घेतल्याने आडस येथील तरुणाची आत्महत्या

केज/प्रतिनिधी:

तालुक्यातील आडस येथे २० रोजी एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मोबाइल चोरीचा आळ घेतल्याने व संशयावरुन जीवे मारण्याची धमकी दिल्याने त्याने आत्महत्या केल्याचे मयत व्यक्तीच्या पत्नीने पाेलीसात तर्कार केली आहे . यावरुन चौघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा सोमवारी नाेंद झाला.

आडस येथे २० रोजी दुपारी साडेतीन वाजता दत्ता आश्रुबा लगसकर (३०) या तरुणाने घरात पत्र्याच्या आडूला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सोमवारी मयत दत्तात्रय यांच्या पत्नी रेखा यांनी धारुर पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार, त्यांचे पती टीव्ही, मोबाइल दुरुस्तीचे काम घरोघर जाऊन करत. गावातीलच वंदना उध्दव नेमटे हिने त्यांच्यावर मोबाइल चोरी केल्याचा आळ घेतला होता. उध्दव प्रभू नेमटे, गणेश भागवत लगसकर व भागवत ज्ञानोबा लगसकर यांनी मोबाइल चोरीच्या संशयावरुन जीवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ केली होती. त्यामुळे दत्तात्रय हे तणावात होते. चोरीचा आळ त्यांच्या जिव्हारी लागला होता. त्यामुळे त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. या प्रकरणी रेखा लगसकर यांच्या फिर्यादीवरुन धारुर ठाण्यात चौघांवर गुन्हा नोंद करण्यात आला.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!