केज

महिलेच्या नावावरील प्लॉट परस्पर नावावर करून घेतल्याची मुलाची तक्रार

युसूफवडगांव/प्रतिनिधी:- केज तालुक्यातील सोनेसांगवी क्र. २ या गावाचे पुनर्वसन झाल्यानंतर जिजाबाई तात्या राऊत या महिलेस पुनर्वसन कार्यालयाने ४०×५० फूट लांबी – रुंदीचा प्लॉट दिला होता.मात्र त्यांच्या परस्पर हा प्लॉट गावातील जनक रघुनाथ जाधव यांच्या नावे ग्रामपंचायतीने केल्याची तक्रार या महिलेचा मुलगा साहेबराव राऊत यांनी जि.प.च्या सीईओंकडे केली आहे.

मांजरा धरणामुळे सोनेसांगवी या गावाचे पुनर्वसन करण्यात आले होते.यावेळी पुनर्वसन कार्यालयाकडून गावातील नागरिकांना प्लॉटचे वाटप करण्यात आले होते. तर यामध्ये सोनेसांगवी क्र. २ या गावातील रहिवाशी जिजाबाई तात्या राऊत यांना पूर्व पश्चिम ४० फूट व दक्षिण उत्तर ५० फूट लांबी रुंदीचा प्लॉट दिला होता.पुढे हा प्लॉट १९९६-९७ मध्ये त्यांच्या परस्पर गावातील जनक रघुनाथ जाधव यांच्या नावे ग्रामपंचायतीत नोंद करण्यात आलेला आहे.हे माहित झाल्यावर त्यांचा मुलगा साहेबराव तात्याबा राऊत यांनी ग्रामपंचायतीकडे हा प्लॉट कशाच्या आधारे जनक जाधव यांच्या नावावर करण्यात आला.याबाबत माहिती अधिकार मार्फत माहिती मागितली असता ग्रामपंचायतने त्या सालचे रेकॉर्ड उपलब्ध नसल्याचे करण दिला त त्यांना माहिती देण्यास जाणिव पुर्वक टाळाटाळ करत असुन तुम्हाला तो प्लॉट नावावर कसा झाला हे कोर्टात जाऊन बघा असे सरपंचाकडुन उत्तर दिले जात आहे.तसेच पुर्नवसन विभागाकडुन मिळालेली जागा हि विकता किंवा दानपत्रक करून कोणालाही घेता येत नसता सुद्धा हा प्लॉट मग जनक जाधव यांचे नावे कसा काय होऊ शकतो याची विचारणा अनेकवेळा ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपात विचारणा केली.मात्र त्याचा खुलासा करण्यात आलेला नाही.त्यामुळे प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी साहेबराव राऊत यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!