अंबाजोगाईक्राईम डायरी
शेतातून जाण्यावरून कुरणवाडी येथे महिलेस मारहाण

अंबाजोगाई: शेतातून जाण्यावरून एका महिलेस बेदम मारहाण केल्याची घटना तालुक्यातील कुरणवाडी येथे दि. २१ रोजी घडली. याप्रकरणी दोघा विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
दगडवाडी येथील रूक्मीनबाई बाबुराव आडे ( वय: ५०) या आपल्या शेतात खुरपणी चे काम करीत होत्या. यावेळी आरोपी गव्हाच्या शेतातून जात असताना रुक्मिणीबाई या शेत तूडवून जाऊ नका असे त्यांना म्हणाल्या. यामुळे संतापलेल्या आरोपींनी रूक्मीनबाई यांना मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच दगडाने कानावर मारून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी रुक्मिणीबाई आडे यांच्या फिर्यादीवरून अजय व्यंकट आडे, गवळणबाई व्यंकट आडे ( दोघे रा. कुरणवाडी) यांच्याविरुद्ध अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस जामदार मुंडे पुढील तपास करीत आहेत.