केज

शिर्डी येथे आर्यवैश्य महासभेच्या अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – सुमित रुद्रवार

केज / प्रतिनिधी :- आर्य वैश्य महासभेचे पहिले अधिवेशन २४ रोजी शिर्डी येथे होत आहे तरी यासाठी जिल्ह्यातील पदाधिकारी व सदस्य बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अधिवेशन यशस्वी करावे असे आवाहन बीड जिल्हाध्यक्ष सुमित रुद्रवार आणि सचिव वैभव झरकर यांनी केले आहे

अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार हे राहणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री मदन येरावार, आ.समीर कुन्नावार, खा. टी. जी. व्यंकटेश, काशी अन्नसत्रमचे मुख्य समन्वयक गुब्बा चंद्रशेखर, बच्चू विलास गुप्ता, दिलीप कुंदकर्ते , एकनाथ मामडे , सुलभा वट्टमवार, माधुरी कोले. पुणे, शिर्डीचे सीओ काकासाहेब डोईफोडे यांचीही विशेष उपस्थिती राहणार आहे
अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार, सचिव गोविंदराव बिडवई, कोषाध्यक्ष सुभाष कन्नावार, राज्य संघटन प्रमुख प्रदीप कोकडवार, भानुदास वट्टमवार, प्रसिद्धी
प्रमुख नरेंद्र येरावार, गजानन चौधरी,
राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल चिद्रवार , अभय कोकड , अजित भावठणकर , विकास डुबे , नागनाथ पारसेवार , गजानन डुबे हे कार्यरत आहेत तरी जिल्हातील समाजबांधवांनी या अधिवेशनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बीड जिल्हाध्यक्ष सुमित रुद्रवार , कार्याध्यक्ष सूर्यकांत महाजन, कोषाध्यक्ष अभय भावठणकर व जिल्हामहासभेच्या वतीने करण्यात आले आहे…!!

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!