बीड

जिल्हातील बस आगारात १५ खासगी चालकांची नियुक्ती

२२ जणांवर बडतर्फीची कारवाई

बीड/प्रतिनिधी:   राज्य शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी मागील अडीच महिन्यापेक्षा जास्त दिवस सुरू असलेला संप थांबण्याच्या मार्गावर नाही. यामुळे प्रशासनाच्या वतीने बससेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी खाजगी पंधरा चालकांची बीड जिल्ह्यातील आगारात नेमणूक करण्यात आली आहे. यामुळे बस गाडीचे स्टेरिंग आता खासगी चालकांच्या हातात राहणार आहे.

मागील अडीच महिन्यांपासून सुरू असलेल्या संपामुळे एसटीचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या वतीने कर्मचाऱ्यांची मनधरणी करूनही कर्मचारी कामावर हजर होत नसल्याने महामंडळाची प्रतिमा जनसामान्यात मलीन होत आहे. विनंती करूनही कर्मचारी कामावर येत नसल्याने अनेक कर्मचारी बडतर्फ करण्यात आलेला आहे. एसटीची सेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी व जनसामान्यांना सेवा देण्यासाठी प्रशासनाच्या वतीने बीड जिल्ह्यातील चार आगारात १५ खाजगी चालकांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच २२ कर्मचारी बडतर्फ करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

चार आगारात चालकांची नियुक्ती

सोमवारी बीड जिल्हातील आगारात १५ खासगी‎ चालकांची नियुक्ती केली गेली.‎ जिल्हातील चार आगारात या चालकांची नियुक्ती करण्यात  आली आहे.

आगाराचे नाव    चालकांची संख्या
बीड  ०८
अंबाजोगाई ०४
गेवराई‎ ०२
माजलगाव‎ ०१
एकुण १५

 

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!