केज

पिण्याच्या पाण्यासाठी साळेगाव येथे नागरीकांचे उपोषण सुरू

गौतम बचुटे/केज :- गावच्या पूर्व भागात पाणी येत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. या भागात पाण्याची सोय करावी या मागणीसाठी साळेगाव ता. केज येथील नागरिकांनी रविवार ( दि. १३) पासून शिवाजी चौकात उपोषण सुरू केले आहे.

या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील साळेगाव येथील बस स्टँडच्या परिसरातील भागात नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. नागरिकांनी अनेक वेळा मागणी करूनही ग्रामपंचायने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे येथील नागरिकांनी दि. ३ फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायतला दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, जर या भागात पाणी पुरवठा झाला नाही; तर दि. १३ फेब्रुवारी रोजी आमरण उपोषणाचा ईशारा दिला होता. त्या नुसार आज दि.१३ फेब्रुवारी रोजी साळेगाव येथील छत्रपती शिवाजी चौकात बालासाहेब बचुटे, लक्ष्मण लांडगे, सचिन राऊत, बलभीम बचुटे, जय जोगदंड,  रत्नाकर राऊत, रामेश्वर शिंदे, सय्यद अझर, अजय बचुटे, अक्षय वरपे, सलामत पठाण, शिवसेनेचे ज्योतिकांत कलसकर  हे उपोषणार्थी उपोषणाला बसले आहेत.

 

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!