ओबीसी समजाला आरक्षण मिळावे म्हणून पाटोद्यात चक्काजाम

पाटोदा /प्रतिनिधी: राज्य सरकारच्या असंवेदनशीलतेमुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे.ओबीसी समाज बांधवांवरील अन्याय लवकरात लवकर दूर करावा या अनुषंगाने पाटोदा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भारतीय जनता पार्टीच्या नेत्या माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पाटोदा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी भारतीय जनता पार्टी पाटोदा भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ओबीसी समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, पंकजाताई मुंडे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, मुंडे साहेबांचा बालेकिल्ला बीड जिल्हा बीड जिल्हा, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे या घोषणाबाजीने पाटोदा शहर दणाणले होते यावेळी पंकजाताई मुंडे यांना मानणारे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने चक्काजाम आंदोलनासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक पाटोदा येथे जमा होते