माजलगाव

थकीत मानधनासाठी उर्दु बालवाडीताईंचे आंदोलन

शिक्षण विभागाचे दुर्लक्ष!

माजलगाव/ प्रतिनिधी :
उर्दू बालवाडी मधील कार्यरत असलेल्या बालवाडीताईंचे थकीत मानधन मिळावे या मागणीसाठी 25 तारखेपासून येथील गट शिक्षण अधिकारी कार्यालयासमोर बालवाडी ताईंनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.

अल्पसंख्यांक मुलांमध्ये बालवया पासूनच शिक्षणाची आवड, गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने जिल्ह्यात शिक्षण विभागाने 2013-14 साली उर्दू बालवाड्या सूरू करून बालवाडीताईंची नाममात्र पाचशे रुपये प्रतिमहीण्यावर नेमणूका केल्या. जिल्हानियोजन समिती मार्फत त्याची आर्थिक तरतूद करून सन 2013-14 या शैक्षनीक वर्षी त्यांना मानधन वाटपहि केल्या गेले.सन 2014 ते 2019 पर्यंत म्हणजे,कोरोना महामारीने सर्व शाळा ऑनलाईन होईपर्यंत या बालवाड्या सुरु राहिल्या परंतु बालवाडीताईना मानधन मात्र दिल्या गेले नाही. या संदर्भात महा.राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने वरिष्ठ पातळीवर या अगोदर इ-मेल करून या ताईचे मानधन देण्याची मागणीही केलेली आहे. परंतु त्यावर प्रशासना कडून कोणतीच उपाय -योजना करण्यात आली नाही. त्यामुळे जर दि 25.06.2021 रोजी पर्यंत या उर्दू बालवाडीताईचे मानधन दिल्या गेले नाहि तर माजलगाव गटशिक्षणाधिकारी कार्यलया समोर कोरोना महामारीच्या सर्व नियमांचे पालन करून, बालवाडीताईसह बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन मा. गटशिक्षणाधिकारी यांच्या मार्फत मा.शिक्षणाधिकारी (प्रा )शिक्षण विभाग बीड यांना दि.14/06/2021 रोजी देण्यात आले आले.परंतु या निवेदनाची दखल घेतली नसल्याने दि. 25/06/2021 रोजी पासून स. 11:00 ते दु.2:00 या वेळेत बेमुदत धरणे आंदोलनास उर्दू बालवाडीताईसह महासंघाने सुरुवात केली असून शिक्षण विभागाने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसल्याने हे बेमुदत धरणे आंदोलन जोपर्यंत थकित मानधन देण्यात येत नाही तोपर्यंत चालूच राहणार असल्याचे महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष भारत टाकणखार, वसंत टाकणखार, ता. सचिव अभिमन्यू इबिते,तालुकाध्यक्ष राहुल टाकणखार,किरण शिंदे,निलेश गावडे, रणजीत राठोड,नारायण भालशंकर, अजिमोद्दीन खतीब,धोंडीराम रामुळे, मनोहर कटारे, जिवन डोंगरे,शिवाजी भालशंकर,किरण माने,सय्यद आयुब, अमित वाघमारे,राजकुमार सोनवणे,कृष्णा हौसरमाल, नागनाथ पडलवार, विश्वनाथ बेद्रे,प्रतीक स्वामी,नितीन गायसमुद्रे,प्रवीण जाधव,शेख असद,सुमेध घाडगे,शंकर पवार,बळीराम घणघाव,शिवाजी व्यवहारे, गोविंद पवार,श्रीकांत जाधव,राजेंद्र सातपुते,मारोती शहापूरकर,नितीन पुटवाड,हनुमंत पांढरपोटे,शेख मतीन, अनिल गावित,लक्ष्मण पोटभरे, रवी आदमाने, विजय वैरागे आदीने केली आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!