धारुर
गायरान धारकांचे धरणे आंदोलन

धारुर/ प्रतिनिधी:
तालुक्यातील सरकारी जमीन अतिक्रमण करणाऱ्यांचे नियमा नुसार प्रकरणी गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत ते त्वरित निकाली काढावीत या मागणीसाठी तालुक्यातील गायरान धारकांनी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले यावेळी गायरान तारकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना दिले. निवेदनावर ऍड विलास लोखंडे, परमेश्वर जोगदंड, बन्सी गायसमुद्रे, लहू गायसमुद्रे, अजय गायसमुद्रे, बालू धिरे, बाळासाहेब कसबे, ब्रह्मचारी मोरे, शंकर बनसोडे यांच्या स्वाक्षर्या आहेत.