महागाईविरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची उपजिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने

अंबाजोगाई/प्रतिनिधी:–
अच्छे दिनचे स्वप्न दाखवुन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने सत्तारूढ झाल्यानंतर मात्र सर्वसामान्य जनतेचे पेट्रोल ,डिझेलची भाववाढ करून कंबरडे मोडले आहे. पेट्रोल, डिझेलची शंभरी गाठली आहे. याच्या निषेधार्थ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी ( दि. १७) निदर्शने करण्यात आली.
या भाववाढीचा सर्व जीवनवाश्यक वस्तुवर परिणाम होऊन त्यांचे भाव गगणाला भिडले आहेत. खाद्यतेलाचे भाव दोनशे रूपयांच्या घरात जाऊन पोहचले आहेत. यामुळे गरीब, कष्टकरी जनतेला कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर कोणताही रोजगार उपलब्ध नव्हता, त्यातही प्रंचंड महागाईमुळे जनता मेटाकुटीला आली आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी तर्फे सरकारच्या जनताविरोधी धोरणाच्या विरोधात आज देशभर निदर्शने करण्यात आली .अंबाजोगाई येथे सुद्धा उपजिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करून खलील मागण्या करण्यात आल्या. पेट्रोल, डिझेलची भाववाढ तात्काळ मागे घेण्यात यावी. जीवनावश्यक वस्त़ुची महागाई मागे घेण्यात यावी. दिल्ली येथे केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कायदयाच्या विरोधात आंदोलन चालू आहे, तरी शेतकरी विरोधी कायदे तात्काळ मागे घ्यावेत तसेच आशा सेविकांना आरोग्य खात्यात कायम नेमणुक देण्यात यावी, किमान वेतन तात्काळ देण्यात यावे . बांधकाम कामगारांचे नोंदणी कार्यालय अंबेजोगाई येथे सुरू करावे. अस्मिता ओहाळ च्या अट्रोसिटी चा पारदर्शक तपास करून तिला न्याय द्या व दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करा. यासह इतर मागण्या करण्यात आल्या यावेळी कॉ. बब्रुवाहन पोटभरे, कॉ. अजय बुरांडे, कॉ. प्रशांत मस्के, कॉ. सुहास चंदनशिव, किर्ती कुंठे, धीरज वाघमारे, राहुल धोतरे, सुमित आवाडे, सचिन टिळक, जगन्नाथ पाटोळे, अशोक शेरकर, महेश देशमुख आदी उपस्थित होते