अंबाजोगाई

दिनकर नांदुरकर यांची बाजार समितीच्या सचिवपदी निवड

अंबाजोगाई: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रभारी सचिवपदी दिनकर नांदुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापुर्वीचे प्रभारी सचिव एम.एस. जाधव सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर नांदुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दिनकर नांदुरकर हे १९९१ अंबाजोगाईच्या कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये कनिष्ट लिपिक म्हणून रूजू झाले. नंतर पदोन्नतीव्दारे ते रोखपाल या पदावर काम पहात होते आता त्यांची प्रभारी सचिव म्हणून निवड करण्यात आली आहे. यावेळी कृ.ऊ.बा. समितीचे चेअरमन गोविंद देशमुख यांनी अभिनंदन करून पुष्पगुच्छ व फेटा बांधून स्वागत केले. यावेळी कर्मचारी उपस्थित होते

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!