पाटोदा

प्रशासनाच्या अजब कारभारामुळे दुकानदारावर उपासमारीची वेळ

पाटोदा/अजीज शेख:
पाटोदा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात सर्वे नंबर 713 मध्ये शशिकांत नारायणकर यांची जागा असून त्याचा सातबारा पीटीआर नक्कल नारायणकर यांच्या नावे आहे. असे असतांना कोणतीही नोटीस न देता प्रशासनाने जीसीपी द्वारे पत्र्याचे शेड उद्ध्वस्त केले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सन 2004 मध्ये त्या जागी अक्षय फुटवेअर लेदर वर्क्स या नावाने शॉप होते. त्या शॉप मधील विद्युत मीटरचे आज पर्यंतही पाटोदा महावितरणला विद्युत बिल भरना नारायणकर करत आहेत. मध्यंतरी पैठण पंढरपूर रस्त्याचे काम सुरू होणार असल्याने संबंधित विभागाची नोटीस आल्यामुळे नारायणकर यांनी आपल्या मालकी हक्काच्या सर्वे नंबर 713 मधील जागेतील दुकान काढले नंतर पैठण पंढरपूर रस्त्याचे काम झाले असल्यामुळे 713 मधील जागा रिकामी असल्याने आपल्या मालकी हक्कीतील जागे मध्ये शशिकांत नारायणकर यांनी पुन्हा आपले दुकान चालू करण्यासाठी पत्र्याचे सेड मारले माञ तहसिल प्रशासनाने येऊन नोटीस न देता 715 मधील पंचनामा करून तहसिल प्रशासनाने मुदत न देता आमची जागा आहे म्हणून नारायकणकर याची बाजु एैकून न घेता तहसिल प्रशासनाने जीसीपी द्वारे पत्र्याचे शेड उद्ध्वस्त करून चर्मकार समाजातील नारायणकर कुटुंबावर अन्याय केला आहे. तहसीलच्या अजब कारभारामुळे नारायणकर यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शशिकांत नारायणकर हे सर्वे नंबर 713 ची माहिती मागत असून पाटोदा प्रशासन त्यांना सर्वे नंबर 715 ची माहिती का देत नसल्याने पाटोदा तहसीलचा अजब कारभार मुळे नारायणकर हे पुर्ण वैतागले आहे. सर्वे नंबर 713 मध्ये शेड मारले असताना नोटीस न देता सर्वे नंबर 715 चा पंचनामा करून पत्र्याचे शेड का तोडण्यात आले असा मोठा गंभीर प्रश्न पुढे यत असून लाखो रुपायचे पाटोदा तहसील प्रशासनाने पत्र्याचे शेड उद्ध्वस्त करून चर्मकार समाजातील कुटुंबावर अन्याय झाल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यांची चौकशी करून आमची बाजू ऐकून घेऊन आम्हाला न्याय द्यावा अशी अपेक्षा पाटोदा तालुक्यातील चर्मकार समाजातील शशिकांत नारायणकर यांनी ठेवली आहे

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!