बीड

जिल्हा समन्वयक पदी आकाश गायकवाड यांची निवड

बीड/ प्रतिनिधी:
त्रिशरण एनलाईटमेंट फाउंडेशन पुणे या विकास दूत प्रकल्पाच्या जिल्हा समन्वयक म्हणून आकाश गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विकासदुत प्रकल्प हा समाजातील अपेक्षित लाभार्थ्यांपर्यंत शासकीय व निमशासकीय कल्याणकारी योजना गाव, शहर, वाडी, वस्ती आणि तांड्यावर व दुर्गम भागात राहणाऱ्या लोकापर्यंत पोहचविण्याचं कार्य पार पाडत आहे. जनजागृती व प्रबोधनाचे कार्य करणारे उच्चविद्या विभूषित , प्रशिक्षण व सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी विकासदूत हे समाजातील लोकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कार्य करतात . याच विकासदूत प्रकल्पाच्या बीड जिल्हा समन्वयक म्हणून आकाश गायकवाड यांची नियुक्ती मराठवाडा समन्वयक दिगंबर वाघ आणि त्रिशरण एनलाईटमेंट फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा प्रज्ञा वाघमारे यांच्या कडून केली असून या फाउंडेशनच्या माध्यमातून कोरोना काळात अनेक उपक्रम राबविण्यात आले आहे. ऑनलाईन पद्धतीने सामाजिक जनजागृती करण्याचे व लोकांना जगण्याचे बळ, आधार व धीर देण्याचे काम त्रिशरण इनलाईटमेंट फाउंडेशनमार्फत केले आहेत तालुका समन्वयक त्यांची निवड झाली आहे. राष्ट्रपाल पडोळे, साईनाथ जोगदंड, गणेश कावळे, आशा शिंदे, मयूर कांबळे. अशा नवसमाज निर्मितीचे समाजसेवेच्या प्रकल्पात काम करण्याची संधी मिळाल्याने जिल्हा समन्वयक आकाश गायकवाड यांची सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!