अंबाजोगाई

पदोन्नती मधील आरक्षणासाठी अंबाजोगाईत निघाला आक्रोश मोर्चा; घोषणांसह महापुरूषांचे फोटो झळकले

अंबाजोगाई (वार्ताहर):

आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी २६ जून २०२१ रोजी पदोन्नती मधील आरक्षण कायम ठेवा यासह विविध मागण्यांसाठी अंबाजोगाईत आक्रोश मोर्चा काढण्यात आला.या आक्रोश मोर्चात आरक्षण हक्क कृती समितीचे वतीने निवेदन देण्यात आले.घोषणांच्या निनादासह महापुरूषांचे फोटो ही झळकले.

अंबाजोगाईत हा मोर्चा २६ जून २०२१ रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथून निघून तो छञपती शिवाजी महाराज चौक मार्गे उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहचताच या मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले.मोर्चेक-यांसमोर मागण्यांचा समावेश असलेल्या निवेदनाचे प्रकट वाचन आनंद सरवदे यांनी केले.त्यानंतर प्रशासनास निवेदन देण्यात आले.मोर्चाची सुरूवात आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त तसेच छञपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिराव फुले,छत्रपती राजर्षी शाहू महाराज,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना अभिवादन करून करण्यात आली.या मोर्चात एससी/एसटी/डीटी/एनटी/व्हिजेएनटी/एसबीसी/ओबीसींच्या मागासवर्गीय कामगार कर्मचारी-अधिकारी संघटना,सामाजिक संघटना,मागासवर्गीय समाज संघटना,विद्यार्थी संघटना या
आंदोलकांनी घोषणा देत आक्रोश मोर्चात सहभाग नोंदवला होता.मागासवर्गीयांच्या शासन निर्णयाद्वारे रद्द केलेल्या ३३ टक्के आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाच्या १७/५/२०१८ व ५/६/२०१८ च्या आदेशान्वये अंतिम निर्णयाच्या अधीन राहून पदोन्नती देण्यात यावी.मंत्रिगट समितीच्या अध्यक्षपदी असलेले अमागासवर्गीय मंत्री अजित पवार यांनी मागासवर्गीयांच्या विरोधात निर्णय घेतल्याने त्यांना निष्कासित करून मागासवर्गीय मंत्री यांची नियुक्ती करावी,या प्रमुख व अन्य मागण्यांसाठी राज्यासह अंबाजोगाईत ही विविध संघटना एकत्र येऊन आरक्षण हक्क कृती समितीच्या नेतृत्वात आक्रोश मोर्चा काढण्यात आला.या आक्रोश मोर्चाला यशस्वी करण्याचा संकल्प करून अनेक समविचारी संघटनांनी या आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला होता.यावेळेस सदरील निवेदन भारताचे महामहीम राष्ट्रपती,पंतप्रधान तसेच महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल व मुख्यमंञी यांना दिलेल्या निवेदनात नमूद प्रमुख १३ मागण्यांचा समावेश आहे.त्यापुढील प्रमाणे आहेत मागासवर्गीयांचे दि.७/५/२०२१ च्या शासन निर्णयाद्वारे रद्द केलेले ३३ टक्के आरक्षण मा.सर्वोच्च न्यायालयाच्या १७/५/२०१८,५/६/२०१८ व केंद्र सरकारच्या दि.१५/६/२०१८ च्या आदेशाप्रमाणे मा.न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून पदोन्नती देण्यात यावी,षडयंत्र करून मागासवर्गीयांची पदोन्नती बंद करण्यास कारणीभूत असलेल्या मंत्रालयातील अधिनस्त अधिकाऱ्यांवर ॲट्रॉसिटी तसेच आरक्षण अधिनियम कलम ८ अन्वये गुन्हे दाखल करावेत,मंत्रीगट समितीच्या अध्यक्षपदी असलेले अमागासवर्गीय मंत्री अजित पवार यांनी मागासवर्गीयांच्या विरोधात निर्णय घेतल्याने त्यांना ताबडतोब निष्कासित करून मागासवर्गीय मंत्री यांची नियुक्ती करावी यासह देशातील कामगार हिताचे कायदे,व्यावसायिक अभ्यासक्रमाकरीता फ्रीशीप योजना,परदेशी शिष्यवृत्तीच्या विद्यार्थी यांचा निर्वाह भत्ता,कर्नाटक सरकारच्या धर्तीवर शिष्यवृत्ती योजना,सरकारी कंपन्या / बँका / सरकारी विभागांचे खाजगीकरण/कंत्राटीकरण बंद करावे,मागासवर्गीय सुशिक्षित बेरोजगारांना नोकऱ्या द्याव्यात,मागासवर्गीयांवरील जातीयवादी अत्याचाराच्या केसेस चालविण्यासाठी तालुकास्तरावर जलदगतीचे स्वतंत्र न्यायालय निर्माण करावे.मंत्रीगट समितीच्या २००६ च्या शिफारशी प्रमाणे ओबीसींना ही पदोन्नतीतील आरक्षण तात्काळ लागू करून ओबीसींच्या स्थानिक स्वराज्य संस्थामधील आरक्षणासाठी तात्काळ आयोग नेमावा,शेतकरी विरोधी केलेले तीन जुलमी कायदे मागे घेऊन केंद्र सरकारने शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांना न्याय द्यावा,कोरोना रूग्णाचा विमा खर्च सरकारने करावा व ज्या कुटुंब प्रमुखांच्या उत्पन्नावर संपूर्ण कुटुंब अवलंबून होते अशी व्यक्ती कोरोनामुळे मृत झाल्यास त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस सरकारने नोकरी किंवा उपजिवीकेचे साधन उपलब्ध करून द्यावे,सर्व गरजू जनतेला रेशनकार्ड असो वा नसो कोरोना / लॉकडाऊन काळात मोफत रेशन देण्यात यावे,कोरोना / लॉकडाऊनमुळे बारा बलुतेदार यांचा व्यवसाय ठप्प झालेला आहे.त्यामुळे त्यांनाही सरकारने आर्थिक सहाय्य करावे यासह इतरही मागण्यांचे निवेदन याप्रसंगी देवून काढण्यात आलेल्या आक्रोश मोर्चामध्ये आरक्षण हक्क कृती समितीचे निमंत्रक तथा महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे विभागीय अध्यक्ष बालासाहेब सोनवणे,ज्येष्ठ सल्लागार देविदास बचुटे,बाबासाहेब धन्वे (जिल्हा सचिव,भा.बौ.म.),संतोष बोबडे,एम.एम.गायकवाड,राहुल पोटभरे,दिलीप भालेराव,बप्पाजी कदम आदींसह सर्व सन्माननिय पदाधिकारी,महिला,युवक सहभागी झाले होते.मोर्चात उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या सर्वांचे विभागीय उपाध्यक्ष संतोष बोबडे यांनी आभार मानले.त्यानंतर मोर्चाची सांगता झाली.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!