अंबाजोगाई

पदोन्नतीमधील आरक्षण वाचविण्यासाठी २६ जूनला अक्रोश मोर्चा

अंबाजोगाई/प्रतिनिधी:

आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी २६ जून २०२१ रोजी पदोन्नतीमधील आरक्षण वाचविण्यासाठी जनआंदोलन व आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी या आक्रोश मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन आरक्षण हक्क कृती समितीचे वतीने करण्यात येत आहे.

अंबाजोगाईत हा मोर्चा २६ जून २०२१ रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथून निघून तो उपजिल्हाधिकारी कार्यालय येथे धडकणार आहे अशी माहिती देवून आवाहन करताना विभागीय अध्यक्ष बालासाहेब सोनवणे म्हणाले की,आज आपण एकत्र येऊन लढलो नाहीतर आपल्या भविष्यातील पिढ्या प्रगती पासून वंचित होतील.आपल्या पूर्वजांनी जे भोगलयं त्या मरणयातना आपल्या मुलाबाळांना,नातेवाईकांना भोगाव्या लागू नये म्हणून एससी/एसटी/डीटी/एनटी/व्हिजेएनटी/एसबीसी/ओबीसींच्या मागासवर्गीय कामगार कर्मचारी-अधिकारी संघटना,सामाजिक संघटना,मागासवर्गीय समाज संघटना,विद्यार्थी संघटना तसेच विविध राजकीय पक्षांच्या सहकार्याने आपल्या अस्तित्वासाठी भावी पिढीचं भविष्य उज्वल आणि सुरक्षित करण्यासाठी एकत्रित लढूया आणि जिंकूया.मागासवर्गीयांच्या शासन निर्णयाद्वारे रद्द केलेल्या ३३ टक्के आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाच्या १७/५/२०१८ व ५/६/२०१८ च्या आदेशान्वये अंतिम निर्णयाच्या अधीन राहून पदोन्नती देण्यात यावी.मंत्रिगट समितीच्या अध्यक्षपदी असलेले अमागासवर्गीय मंत्री अजित पवार यांनी मागासवर्गीयांच्या विरोधात निर्णय घेतल्याने त्यांना निष्कासित करून मागासवर्गीय मंत्री यांची नियुक्ती करावी,या प्रमुख मागणीसह अन्य १९ मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्यस्तरावर ८० संघटना एकत्र येऊन आरक्षण हक्क कृती समितीच्या नेतृत्वात जनआंदोलनाची पूर्व तयारी सुरू आहे.लातूर विभागातील प्रमुख संघटना आणि समविचारी सामाजिक व राजकीय संघटनांना सोबत घेऊन मोर्चाची जोरदार तयारी सुरू केली आहे.या जनआंदोलन व आक्रोश मोर्चाला यशस्वी करण्याचा संकल्प करून अनेक समविचारी संघटनांनी या आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला आहे. जनआंदोलन व आक्रोश मोर्चामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन आरक्षण हक्क कृती समितीचे निमंत्रक महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे विभागीय अध्यक्ष बालासाहेब सोनवणे,ज्येष्ठ सल्लागार देविदास बचुटे,बाबासाहेब धन्वे (जिल्हा सचिव,भा.बौ. म.),द्वारकाताई कांबळे,संतोष बोबडे,प्रमोद शिंदे,एम.एम.गायकवाड,रविंद्र अचार्य,बप्पाजी कदम,गौतम पारवे,धनंजय वाघमारे,राहुल पोटभरे,धिवार समाधान,मंगलाताई भुम्बे. शालनताई जोगदंड,घुमरे शेषेराव, प्रल्हाद गडदे, संभाजी गडदे, सोनेराव लगसकर, वैजेनाथ गडदे, रमेश लोखंडे, गौतम जोगदंड, प्रदिप समुद्रे, पतकराव वैजेनाथ, निलेवार सचिन, पल्लेवाड दादा, चेनलवाड साहेब, गुहाडे साहेब,दिलीप भालेराव, दिपक गायकवाड, दासुद रमाताई, साळवे पंचशिलाताई, मोहनजी कांबळे, खळगे,राजेंद्र सरकटे, सरवदे आनंद,बी एन.गायकवाड,सचिन गायकवाड,मस्के विष्णु,राजेश कापसे,पाखरे सर,मस्के बबन आदींसह सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!