अंबाजोगाईक्राईम डायरी
ॲल्युमिनियम च्या तारा चोरल्या

अंबाजोगाई/ प्रतिनिधी
तालुक्यातील मूर्ती शिवारात असलेल्या डीपी पासून वाकडी या गावाकडे जाणाऱ्या ॲल्युमिनियमच्या १८० मीटर लांबीच्या तारा चोरून नेल्याची घटना १० तारखेस घडली.
यातून महावितरणचे सहा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे याप्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्यात लाईनमन शिवाजी अशोक नागरगोजे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध १२ तारखेला बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहकॉ केंद्रे करीत आहेत.