आष्टी

गोरगरिबांसाठी ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर आष्टीत रुग्णवाहिका सुरू

आष्टी /प्रतिनिधी

सध्या रुग्णांना उपचारासाठी नगर,पुणे, औरंगाबाद येथे घेऊन जाण्याचीवेळ आली तर रूग्णांच्या नातेवाईकांना अवास्तव पैसे भरावे लागतात त्यामुळे आम्ही आष्टी शहरात ना-नफा,ना-तोटा या तत्वावर रूग्णवाहिका सुरू करीत असून, सर्वसामान्य नागरिकांना याचा नक्कीच आधार होणार असल्याचे प्रतिपादन आ.बाळासाहेब आजबे यांनी केले.

आष्टी बाळासाहेब आजबे मित्र मंडळाच्या वतीने आज सोमवारी (दि. ७) शहरातील किनारा चौकातील मध्यवर्ती कार्यालयात रूग्णवाहिकेच्या लोकार्पणच्या छोटेखानी कार्यक्रमात आ.आजबे बोलत होते. यावेळी किशोर हंबर्डे, आण्णासाहेब चौधरी, काकासाहेब शिंदे, डाॅ.शिवाजी राऊत, पंचायत समिती सदस्य परमेश्वर शेळके, संदिप सुंबरे, नाजीम शेख, भाऊसाहेब घुले, राजेंद्र जरांगे, सुनिल नाथ यांच्यासह आदि उपस्थित होते. सुरूवातीला आष्टीतील पत्रकारांच्या हस्ते रूग्णवाहिकेची पुजा करत लोकर्पण केले.पुढे बोलतांना आ.आजबे म्हणाले, देव न करो कोरोनाची तिसरी लाट आता येऊ नये,जरी तिसरी लाट आली तरी आपण प्रशासकीय पातळीवर संपूर्ण तायारी केली आहे.तसेच कोरोना काळात अनेक रूग्णांना बाहेर उपचारासाठी घेऊन जाण्याची वेळ आली.त्यावेळी रूग्णवाहिका चालकांनी मनमानी दर घेत अडणून बघण्याचे प्रकार घडले आहेत.आपण आमदार फंडातून तीन तालुक्यासाठी तीन कार्डीयाक रूग्णवाहिका मागीतल्या असून येणाऱ्या काही काळातच त्या रूग्णवाहिका तीन्ही तालुक्यातील रूग्णालयालाच्या सेवेत येतील.तसेच आष्टी, पाटोदा येथे आॅक्सीजन बेडची सुविधा केली असल्याचेही त्यांनी सांगत आज जी रूग्णवाहिका आम्ही सुरू केली आहे.ती रूग्णांना माफक दरात उपलब्ध करून दिली जाणार असल्याचेही त्यांनी आवर्जुन सांगीतले.

आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका
आष्टी मतदार संघातील असलेल्या अठरा प्राथामिक आरोग्य केंद्रांवर आपण एक रूग्ण वाहिका मिळावी यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला असून,लवकरच प्रत्येक आरोग्य केंद्राला एक रूग्ण वाहिका मिळणार अाहे. आष्टीत ७० तर पाटोद्यात ५० आॅक्सीजन बेड उपलब्द केले आहेत.तसेच आष्टी ग्रामिण रूग्णालयातही आॅक्सीजन प्लंटचे काम मोठ्या गतीने सूरू असल्याचे आ.आजबे यांनी सांगितले.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!