केज

एक लाखाची रक्कम केली परत, राेखपालचा प्रामाणिकपणा

केज/प्रतिनिधी:

कृषी दुकानदाराने बँकेत भरलेल्या रक्कमेत एक लाख रुपयांची आगाऊ आल्याने केज शहरातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेतील महिला कॅशिअरने सदर दुकानदारास एक लाखाची रक्कम परत करून प्रामाणिकपणा दाखविला.
केज शहरातील खंडेश्वर कृषी सेवा केंद्राचे चालक गोविंद गायकवाड यांनी शुक्रवारी नोकराजवळ एक लाख ६३ रुपये महाराष्ट्र बँकेतील खात्यावर भरणा करण्यासाठी स्लिप भरून एका पिशवीत रक्कम दिली. नोकराने बँकेत जाऊन सदरची स्लिप आणि रक्कम खात्यावर भरणा करण्यासाठी दिली. मात्र जमा करण्यास दिलेली रक्कम ही स्लिपवरून दिलेल्या रक्कमेपेक्षा एक लाख रुपये जास्तीचे असल्याचे कॅशिअर रचना भुतांबरे यांनी बँकेच्या शाखा व्यवस्थापकांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर शाखा व्यवस्थापक प्रवीण सोनवळकर यांनी बँकेचे ग्राहक गोविंद गायकवाड यांना फोन करून बँकेत बोलावून घेतले. त्यांच्याकडे जास्तीची आलेली एक लाख रुपयांची रक्कम परत केली. कॅशिअर रचना भुतांबरे यांनी प्रामाणिकपणा दाखविल्याबद्दल गोविंद गायकवाड यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी शाखा व्यवस्थापक प्रवीण सोनवळकर, रोखपाल तेजस्विनी निर्मळ, अधिकारी अक्षय भुतेकर, शाम थोरात हे उपस्थित होते.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!