क्राईम डायरीपाटोदा

चुंभळीत सशस्त्र दरोडा वृद्धेसह दोघांना जबर मारहाण

नगदी पन्नास हजारासह साडेसहा तोळे सोने केले लंपास

पाटोदा/आजीज शेख
पाटोदा तालुक्यात चुंभळी येथील शेतवस्तीवर राहणाऱ्या घरावर मंगळवारी ( दि. ८) रात्री अज्ञात दरोडेखोरांनी हल्ला करत एका वयोवद्धेसह दोघांना जबर मारहाण केली. चाकुचा धाक दाखवून त्यांच्याकडील नगदी ५० हजारासह कपाटातील सोने आणि महिलेच्या अंगावर असलेले दागिने असे एकूण साडेसहा तोळे सोने लंपास केल्याची घटना घडली.

रविंद्र शहादेव सिरसाट ( रा . चुंभळी ) हे त्यांच्या उंबरविहिर रस्ता येथील शेतात आपल्या आई – वडिलांसह राहतात. सोमवारी रात्री साडेबाराच्या दरम्यान त्यांच्या गोठ्यात झोपलेल्या शहादेव निवृत्ती सिरसट यांना चोरट्यांनी दगडाने मारून जखमी केले . त्यावेळेस त्यांनी आरडाओरड केला असता शेजारीच पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेला त्यांचा मुलगा रविंद्र सिरसट हा बाहेर निघाला असता धारदार शस्त्राने दरोडेखोरांनी त्याच्यावर वार करून गंभीर जखमी झाला. चोरटयांनी गोठ्यात झोपलेल्या सखुबाई यांच्या डोक्यात गज मारून त्यांना जखमी केले . हल्ल्यात रविंद्र शहादेव सिरसट हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर बीड शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत . घटनेची माहिती पाटोदा पोलिसांना मिळल्यानंतर रात्री तात्काळ त्याठिकाणी पोलिसांनी धाव घेऊन पहाटेपर्यंत पोलीस तेथेच थांबले होते . घटनेची माहिती आष्टीचे डीवायएसपी विजय लगारे यांना मिळाल्यानंतर तेही घटनास्थळी दाखल झाले होते . स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय भारत राऊत , पाटोदा पोलिस ठाण्याचे पीआय महेश आंधळे यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला . व पुढील तपास पाटोदा पोलीस करत आहे.

सोन्याचे दागीने पळविले

या वेळी दरोडेखोरांनी त्यांना चाकुचा धाक दाखवून कपाटात ठेवलेले पन्नास हजार रुपये,कपाटातील सोने रविंद्र सिरसाट यांच्या पत्नीच्या अंगावरील सोने व सखुबाई सिरसट यांच्या अंगावरील सोने हिसकावून घेतले . यामध्ये गंठण , दोन मणिमंगळसुत्र एक नेकलेस , कानातील दोन जोडं, कुडुक याचा समावेश आहे .

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!